सोलापुरमें अत्याधुनिक रक्तपेढी का निर्माण यहाँ के सेवाभावी बन्धुओंने एक प्रशंसनीय कार्य किया है। जो भी कार्य हो सर्वोत्तम हो यह भी कर दिखाया है। महाराष्ट्र में यह उनकी कीर्ति है। सभी प्रकार से भविष्य में भी यश मिलता रहे, यही प्रभु चरणोंमें प्रार्थना।
पूर्णपणे सुसज्ज असलेली ही रक्तपेढी निव्वळ सेवेच्या उद्देशाने उभी आहे हे पाहून मी खूप प्रभावित झालो. अशा सेवा प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो जिथे सर्वजण नि:स्वार्थपणे मोठ्या भक्ती आणि उत्साहाने काम करत आहेत. मला खात्री आहे की हे अनेकांद्वारे अनुकरण करण्यासाठी एक उदाहरण प्रस्थापित करेल आणि आणखी लोकांना गरजूंच्या सेवेसाठी पुढे येण्यासाठी प्रेरणा देईल.
शुध्द सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है। यह हम सब कार्यकर्ताओंके ध्यान में रहे, यह परमेश्वरसे प्रार्थना। यह रक्तपेढी का काम यशस्वी हो, यह भी प्रार्थना।
सर्व मित्रमंडळीच्या सहवासांत आनंद आला. जुन्या स्मृतिंना उजाळा मिळाला. सर्व बाल-तरुणांनी समाजांत उत्तम नाम मिळवले व समाजसेवेची अनेक कामे चालू केली ते पाहून मनामध्ये उचंबळणा•या भावनांना शब्दरुप देणे कठिण आहे. अशीच आपल्या प्रिय समाजाचे जीवन उन्नत करण्याची प्रेरणा सतत प्राप्त होवो, हीच सदिच्छा.
रक्तदान महादान हे खरेच पण दान परत व्यवस्थित सुपात्री देणे, रक्षिणे हे ही महत्त्वाचे. सुव्यवस्थित समाजकार्य सुसंस्कारानेच साधते
संघ हा ज्यांचा ब्लडग्रुप आहे, अशा केशवव्रतींनी सुरू केलेली ही रक्तपेढी आहे. त्यामुळे त्याच्या कामाची शुध्दता, समाजशरणवृत्ती आणि कार्यपध्दतीतील शिस्त उत्तम राहणार हे निश्चित. हे कार्य असेच निर्दोष चालले पाहिजे.
ज्या महापुरुषाने आपल्या सर्वस्वाचे दान समाजाला केले त्या पूजनीय डॉ. हेडगेवारांच्या नावाने पुनीत झालेल्या या रक्तपेढीचे उपयुक्त काम प्रत्यक्ष पाहण्याची संधी आज मिळाली, आनंद झाला. सोलापूर शहराची फार मोठी गरज या रक्तपेढीमुळे भागवली जात आहे. ही मानवतेची सेवा आहे. निरपेक्ष बुध्दीने चालवलेले हे सेवाव्रत असेच चालत राहो, ही इच्छा.
अगदी थोड्या वेळात डॉ. वळसंगकर यांनी प्रत्यक्ष सर्व माहिती दिली. अत्यंत व्यवस्थित, सर्व रचना पाहून मनापासून आनंद झाला. रक्तपेढी हा आता महाराष्ट्रात अभिमानाचा विषय झाला आहे. सर्व प्रकारच्या वाढीसाठी या रक्तपेढीस माझ्या हृदयापासून शुभेच्छा!.